नमस्कार,
आधार संकल्पना प्रतिष्ठानच्या वधूवर सुचक केंद्राच्या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत आहे.
मराठा समाज संपूर्ण जगभर पसरलेला आहे. त्यामुळे लग्न जमविणे हल्ली कठीण समस्या होऊन बसलेली आहे. त्याचे निराकरण व्हावे म्हणून आम्ही मागील वर्षी आधार संकल्पना संचलित श्रीकृपा समुह विविध वधूवर सुचक वाॅटसअप ग्रुपला जन्म दिला,अनेक लग्न ठरली परंतु एका व्यक्तीला २५६ स्थळेच ग्रुप वर पहायला मिळतात, त्यामुळे मर्यादा आल्या म्हणून विचाराअंती आम्ही एक वेबसाईट अनेक स्थळे पहाता यावीत, म्हणून आधार मेट्रोमनी वेबसाईट आपल्या सेवेसाठी चालू करीत आहोत.सर्व वाटसप ग्रुप वर आपल्याकडे तीन हजार पाचशे स्थळे आहेत.लवकरच ती वेबसाईटवर येतील.
आमच्याकडे वधू व वर यांची भरपूर आॅनलाईन स्थळे उपलब्ध आहेत. व्यवसायिक, डाॅक्टर, वकील, सिए, सिएस, विविध क्षेत्रातील उच्चतम नोकरवर्ग तसेच गावाकडील भरपूर स्थळे उपलब्ध असुन सामाजिक कार्य व्हावे आणि सुसंस्कृत समाज घडावा. हीच अपेक्षा आहे तरी आपण तसेच आपल्या नातेवाईक, मित्र मंडळी पर्यंत मेसेज पोहचवावा. जेणेकरून आपणांस जास्तीत जास्त स्थळे पाहता येऊन अनुरूप वधूवर उपलब्ध होतील. या समाजकार्यात आपल्या प्रत्येकाचा खारीचा वाटा व्हावा असे आपणांस मी नम्रपणे आव्हान करीत आहे. आपला प्रतिसाद नक्कीच मिळेल अशी अपेक्षा .
सभासदांना नम्र विनंती आहे की कुणाचे लग्न जर झाले असेल तर कृपया कळवा जेणे करून तुमची प्रोफाईल डिलीट करता येईल
धन्यवाद .